शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यासाठी केंद्र निहाय लसीकरण कॅम्प लावण्याची हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची मांगणी

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

15 जुलै 2021 पासून औरंगाबाद ग्रामीण भागात प्रत्यक्ष शाळा सुरू झाले आहे याबाबत प्रथम शासनाचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार ! कारण मागील जवळपास वर्षभरापासूनपासून प्रत्यक्ष शाळा बंद होत्या व ऑनलाइन अभ्यास सुरू होता व शैक्षणिक नुकसान भरपाई करिता आजपासून ग्रामीण भागात शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.


यात एक महत्वाचे भाग म्हणजे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण. ज्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे लसीकरण झाले नाही त्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी केंद्रनिहाय  वेगळे कॅम्प लावून पुर्णतः 1 ते 12 वी पर्यंत शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे औरंगाबाद चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी  मा.संजीव जाधवर साहेब यांना भेटून चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. 


शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय 07 जुलै 2021 प्रमाणे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी  लसीकरणासाठी प्राधान्याने नियोजन करून सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. अशी विनंती करण्यात आली. एक प्रत औरंगाबाद जिल्हा परिषद चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी बी चव्हाण साहेब यांना ही देण्यात आली. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण सर, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताजींमोद्दीन सर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)