पुरग्रस्तांना शिक्षक सहकार संघटनेचा मदतीचा हात.. एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देणार राज्य संघटनक रवी ढगे यांची माहिती !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील अमरावती व अकोला कोकण मधील  चिपळुण, महाडसह संपूर्ण कोकणात पुराने थैमान घातले  असून हजारो कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलेली आहेत. पुराच्या कचाट्यात सापडलेल्या कोकणवासियांचे कंबरडे मोडले आहे. 


आजवर आलेल्या अनेक संकटात शिक्षक सहकार संघटनेने नेहमीच पुढाकार घेऊन भरीव मदत केली आहे. यापूर्वी २०१९ साली सांगली, कोल्हापुर भागात आलेल्या महापुराच्या वेळीही शिक्षक सहकार संघटनेने पूरग्रस्तांना सव्वा लाख रुपयांची मदत केली होती. तसेच कोरोना काळातही एक दिवसाचा पगार, रक्तदान शिबीर, मदतनिधी, वेगवेगळे कॅंप घेऊन गरजूंना मदत केली आहे. तेच समाजभान ठेवून पुन्हा एकदा खचलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या शिलेदारांनी कंबर कसली आहे. यात शिक्षक सहकार संघटनेने जिल्हावार मदत जमा करण्याचे नियोजन केले असून ती मदत लवकरच गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. 


शिक्षक सहकार संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सोशल मिडीयाच्या माध्यमाने मदतीबाबत जनजागृती करत असून फक्त सेवेचे कर्तव्य न पाळता सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या शिलेदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्धार केला आहे.

        

पश्चिम महाराष्ट्रा सह कोकणवासियांवर ओढावलेल्या या परिस्थितीतून त्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास १५ हजार शिक्षक सहकार संघटनेच्या शिलेदांनीही मदतीचा निर्धार केला आहे. प्रत्येक जिल्ह्याने लवकर बैठका घेऊन मदत निधी जमा करण्याचे आवाहन राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केले आहे. 


यावेळी मुख्य राज्यसंघटक रवी ढगे, कैलास चव्हाण (राज्य उपाध्यक्ष), किशोर पवार (राज्य कोषाध्यक्ष), मनोज कोरडे (पुणे विभागप्रमुख), रवी अंबुले (नागपूर विभागप्रमुख), दत्ता राठोड (मराठवाड विभागप्रमुख), शुभांगी चौधरी (महिला प्रतिनिधी), मेघा राऊत (महिला प्रतिनिधी), दत्तात्रेय क्षीरसागर (कोकण विभाग प्रमुख), अविनाश जुमडे (नाशिक विभाग प्रमुख),दीपक शिंदे जि अ नांदेड , सचिन वाघमारे, जितेंद्र गवळी, दिपक परचंडे, सुरेंद्र गौतम, शशिकांत चाफेकर, गजानन देवकत्ते, गणेश देशमुख, मनोज बनकर, राहुल मसुरे, नवनाथ मेढे, अनिल बसुळे, निलेश देशमुख, विठ्ठल टेळे, राजाराम कात्रे, उमाताई घोरपडे, भिमाशंकर ईज्जपवार, शरदचंद्र कुंवर, रमेश आलापुरे, संदीप होळकर, गुलाब बिसेन, रवी तिजारे, प्रमोद डोंगरे, अंबादास कवतिके ,दयाशंकर लाखेश्वर लंजे, प्रमोद शहारे आदींनी आवहान केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)