माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) सन २०२१ च्या निकालाचे गुणपत्रक व अभिलेख वितरणा बाबत मार्गदर्शक सूचना .
कोविड 19 विषाणूच्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार माध्यमिक शालाना प्रमाणपत्र (इ. १० वी)सन २०२१ चा निकाल जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार सदर निकालाचे गुणपत्रक च तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख शाळांना वितरणाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1. प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्र निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडकी संख्या वाढविण्यात येऊन गुणपत्रिका वितरीत करण्यात याव्यात.
2. सदर गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून शाळांना वितरीत करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असेत.विभागीय मंडळानी सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार तयार केलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र(इ.१० वी) सन २०२१ च्या निकालाची गुणपत्रक शाळांना दिनांक ७/८/२०२१ व ९/८/२०२१ रोजी वितरीत करावीत.
3. दिनांक ९/८/२०२१ दु.३.०० वा पासून संबंधित शाळांनी विद्याथ्यांना त्यांचे गरजेनुसार व सोईनुसार शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करुन गुणपत्रक वितरण करावे. याबाबत सर्व शाळांना परिपत्रकान्वये कळविण्यात यावे, विद्याथ्यांना विशिष्ट तारखेला गुणपत्रक घेऊन जाण्यासाठी आग्रह करू नये. तसेच शाळांमध्ये पालक विद्यार्थी यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करावे.
4. गुणपत्रिका वितरणासाठी वितरण केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .