उपक्रम : जाऊ निसर्गाच्या सानिध्यात !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
सद्या शाळा बंद पण शिक्षण सुरू असून कोरोना मुळे सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले आहे तसेच नांदेड जिल्हा अधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे व लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र सोनटक्के यांनी झाडे लावण्या बाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मारतळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे व बियांचे रोपण केले आहे.
येथील वर्ग 5 वीच्या मुलांनी चला जाऊ निसर्गाच्या सानिध्यात या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत तयार केलेली तुळशीचे , पिंपळाचे,आंब्याचे रोपं व मुलांनी वर्षभर जमा केलेल्या बिया यात जांभुळ, सीताफळ,आंबा, बोराच्या आदी बियांची मारतळा गावातील तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेत लावण्यात आले.
यावेळी हलका पाऊस सुरूच होता मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात पावसाचा आनंद घेत हे कार्य केले मागील वर्षी सुद्धा मुलांनी झाडे व बिया यांची लागवड केली होती यामुळे अशा उपक्रमातुन मुलांना निसर्गा बद्दल प्रेम आपुलकी निर्माण होईल तसेच निरीक्षण क्षमता विकसित होण्यास मदत होईल यावेळी मुलांना निसर्गाच्या विविध गोष्टीची माहिती उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी सांगितले यावेळी रमेश हणमंते व मोरू मावशी विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .