महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन च्या राज्य संघटक पदी शेख अब्दुल रहीम यांची निवड...

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत देशात 2005 च्या नंतर जे कर्मचारी सेवेत रुजू झाले आहे त्यांना जुनी पेंशन लागू व्हावा म्हणून एक मोठी चळवळ उभी झाली आणि यात अनेकदा यश पण ही हाती लागले आहे. आज 17 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेंशन हक्क संघटना संचलित महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या विश्वस्त मंडळ ची बैठक संपन्न झाली यात महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटन च्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी शेख अब्दुल रहीम सर यांची राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. 


शेख अब्दुल रहीम सर हे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात तसेच विद्यार्थी-शिक्षकांचे प्रश्नांसाठी सदैव अग्रेसर राहते व त्यांनी आपल्या स्वताच्या हिंमतीवर  पूर्ण महाराष्ट्र मध्ये  नव्हेच गल्ली ते दिल्ली पर्यंत नाव कोरले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्य सरचिटणीस गोविंद उगले यांनी शेख अब्दुल  रहीम सर यांची औरंगाबाद येथे एक महत्वाची राज्यस्तरीय(विश्वस्त)  बैठक मध्ये राज्य संघटक पदी निवड केली आहे. जूनी पेंशन हक्क संघटन च्या सर्व  विश्वस्त मंडळांनी विश्वास व्यक्त केले की शेख अब्दुल रहीम सर हे 2005 च्या नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत लागलेले आहे त्यांना जुनी पेंशन मिळावी याकरिता सर्व सहकारी सोबत संपूर्ण कार्यक्षमतेणे कार्य करतील अशी आशा व्यक्त केली आहे. 


यावर शेख अब्दुल रहीम सर यांनी ही आश्वाशीत केलं  की राज्यभरातील कर्मचाऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जूनी पेंशन मिळावी याचा विचार करून त्या साठी उपाय योजना केल्या जाईल व सदैव कर्मचाऱ्यांच्या  सेवेत हजर राहीन. आपण दिलेली इतकी मोठी संधी चं सोनं करणार असे ही सांगितले. या निवडी बद्दल सर्व शिक्षक संघटना च्या पदाधिकारी, नेते गण व मित्र मंडळींनी अभिनंदन केले. या विश्वस्त मंडळी ची बैठकीस प्रविण बडे,प्राजक्त झावरे,आशुतोष चौधरी,सुनील दुधे,गौरव काळे,शैलेश राऊत,नदीम पटेल,कुणाल पवार,रामदास वाघ,संजय गंभीरे,दिपीका एरंडे,धनंजय परदेशी भीमराव मुंडे अशोक चव्हाण आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)